विशाल भास्करराव देव, जालना

 

सद्गुरु वासुदेव देव हे माझे आजोबा. मी माझ्या आजोबांना पाहिलेले नाहीये, पण त्यांच्याबद्दल त्यांच्या शिष्यांना आलेले अनुभव मी ऐकलेले आहेत. आमचे राहते घर जालना येथे माझ्या  आजोबांच्या पादुका आहेत, व दर वर्षी आम्ही तिथे गुरु पौर्णिमेचा उत्सव फार मोठ्या उत्साहाने करतो. उत्सवासाठी त्यांचे  शिष्य महाराष्ट्रासह वेगवेगळ्या भागातून येत असतात. गुरुपौर्णिमा उत्सव म्हणजे आमच्या सर्व देव परीवारा साठी पर्वणीच आहे. आम्ही सर्व देव परीवारातील सदस्य एकत्र जमून उत्सव मोठ्या आनंदाने  साजरा करतो. माझे वडील श्री भास्करराव देव यांनी आमच्या  आजोबांच्या  पुस्तकांचे प्रकाशन केले आहे. पादुका आमच्या राहत्या घरी असल्यामुळे मला पादुकांच्या पूजनाचे भाग्य लाभलेले आहे.  पादुका पूजन करतांना, मला एक वेगळाच आनंद होतो. आजोबांचे आशीर्वाद आमच्या सर्व देव परिवारास लाभलेले आहेत. परत एकदा माझ्या आजोबांना नमन